माणगावमधील प्रश्‍नांबाबत उपोषण करणारच

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील विविध प्रश्‍नासंदर्भात नगरपंचायतीने सकारात्मक विचार करून तशा प्रकारचे लेखी पत्र आपल्याला दिले नाही तर 1 नोव्हेंबरला नगरपंचायत कार्यालय माणगाव जवळ आपले बेमुदत उपोषण सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल असा इशारा ग्रामस्थ तथा पत्रकार सलीम शेख यांनी नगरपंचायतीला दिला आहे.

नगरपंचायतीने मध्यंतरी विकासकामे करण्याच्या नावाखाली घरपट्टी व नळ पाणीपट्टी दुपटीने वाढविण्याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे पाणीपट्टी दुपटीने 1000 रुपयांवरून 2000 रुपये वाढवून कोरोना व निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या हद्दीतील ग्रामस्थांना आणखीनच शॉक दिला आहे. तसेच डंपिंग ग्राउंडचा ऐरणीवर आलेला प्रश्‍न मोठमोठ्या गृहप्रकल्प इमारतीच्या काळ नदीत सोडण्यात येत असलेला सांडपाणी,जुने माणगाव व नाणोरे ग्रामस्थांना करण्यात येणारा अशुद्ध पाणी पुरवठा,प्लास्टिक पिशव्या बंदी कागदावर अशा विविध प्रश्‍नासंदर्भात 1 नोव्हेंबर रोजी बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थ तथा पत्रकार सलीम शेख यांनी नगरपंचायतीला दिला आहे.त्यांच्या या उपोषणास विविध पक्ष, संस्था, संघटना तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.

नगरपंचायत हद्दीतील या विविध प्रश्‍नाबाबत ग्रामस्थांमध्ये निश्‍चितच चीड असून त्यांचा उद्रेक 1 नोव्हेंबरला उपोषण सुरू झाल्यावर नगरपंचायतीला दिसून येईल असे उपोषणकर्ते सलीम शेख यांनी सांगत जोपर्यंत जनहितार्थ या प्रश्‍नाकडे नगरपंचायत गांभीर्याने पाहणार नाही तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारच्या चर्चेला तयार होणार नाही.मी जनहितार्थ उपोषणाचा निर्णय घेऊन आता मफआर या पार या भूमिकेतून ही लढाई मी लढत असल्याचे शेख यांनी सांगत या करीता माणगावकरांनी मला साथ द्यावी असे अवाहन शेख यांनी केले आहे.

Exit mobile version