पेढांबे येथे आरोग्य शिबीर संपन्न

| वाघ्रण | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील पेढांबे येथे प्रबोधन सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर 23 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सरपंच रसिका पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्रबोधनचे अध्यक्ष ॲड. गणेश पाटील, उपाध्यक्ष डॉ. मिलीद पाटील, सचिव आरती पाटील, खजिनदार मनिषा पाटील, सहसचिव सचिन पाटील, संचालक वाघ्रण ग्रा.पं माजी सदस्य दिपक पाटील आदी उपस्थीत होते. या शिबीरात डॉ.मिलींद पाटील, डॉ. चेतना गडा, डॉ. सानिका वेलोसकर यांनी आयुर्वेदीक उपचाराअंतर्गत रुग्ण तापसणी मोफत करून मोफत औषधे देण्यात आली. या शिबिरात मान, खांदा, पाठदुखी आदीची दुःखणी तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी आरती गुरव, वैष्णवी कोळी, ॲड. चित्रा वडके, रुपेश पाटील, राजकुमार पाटील, अनिल पाटील, अजित पाटील, समाधान पाटील आदीनी सहकार्य केले.

Exit mobile version