| पेण | वार्ताहर |
सोबती ट्रस्ट पेण व स्टाफ अॅकेडमी भाउसाहेब नेने यांच्या संयुक्त विदयमाने भाउसाहेब नेने महाविदयालयात आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. त्या आरोग्य शिबीरात माधव जोशी यांनी आरोग्या विषय विनोदी शैलीत विदयार्थ्यांना समजावून सांगीतला. विद्यार्थ्याच्या बरोबर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम देखील पार पाडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोबती संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब नेने, बापूसाहेब आठवले, व प्राचार्य डॉ.सदानंद धारप यांच्या हस्ते करण्यात आले. तर शेवटी प्रा.एन.डी.कांबळे यांनी आभार मानले.