माणुसकी प्रतिष्ठानकडून आरोग्य तपासणी

माणुसकी प्रतिष्ठानकडून आरोग्य तपासणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माणुसकी प्रतिष्ठान शाखा खंडाळा अलिबाग व खासगी मराठी शाळा भाल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती शिबिर प्राथमिक शाळा भाल येथे मुलांची आरोग्य तपासणी तसेच जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जयवंत गायकवाड, सुरेश पाटील, तानाजी आगलावे, उज्वला चंदनशिव, संपदा माळी, शाळेतील शिक्षक, आशा सेविका अंगणवाडी सेविका, डॉ.जाधव उपस्थित होते.डॉ. राजाराम हुलवान यांनी आरोग्याबद्दल माहिती देत व स्वच्छतेमुळे कसे आपण निरोगी राहू हे सांगितले तसेच जागतिक एड्स दिनाबद्दल माहिती सांगितले. प्राथमिक भाल शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा वारगे यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

Exit mobile version