बोर्ली ग्रामपंचायतीत आरोग्य तपासणी शिबीर

350 नागरीकांनी घेतला लाभ
। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत व मुंबई-खार येथील श्री रामकृष्ण मठ व मिशन हॉस्पिटल, अलिबाग येथील श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात मोफत नेत्र चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. यावेळी सरपंच डॉ.चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वामन चुनेकर, श्रीरामकृष्ण मठ व मिशन हॉस्पिटल इन्चार्ज स्वामी दयामुर्त्यानंदजी, ग्रामपंचायत सदस्य गणेश कट, वैशाली वाघमारे, मनोहर भोपी, संतोष कट, प्रशांत कट,नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.संगीता राऊत, डॉ.किरण मार्यक, सिस्टर रश्मी पवार, मारिया डिसोझा, सचिव भालचंद्र देशपांडे मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात ग्रामपंचायत हद्दीतील लोकांची तज्ञ डॉक्टर व त्यांच्या टिमने कान, नाक, घसा व इतर आजारांबाबत मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी करण्यात येऊन चष्मे वाटप करण्यात आले. शिबिराचा परिसरातील 350 जणांनी लाभ घेतला. यावेळी मोतीबिंदू असणार्‍या 58 जणांना लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version