। उरण । वार्ताहर ।
श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोप्रोली तालुका उरण व सुश्रुषा सुपर स्पेशलिटी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कोप्रोली उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
त्यामध्ये ब्लडप्रेशर टेस्ट ,शुगर टेस्ट, ईसीजी तपासण्या करण्यात आल्या. सदर कॅम्प हा कोप्रोली गावचे प्रतिष्ठित व्यक्ती मनोहर म्हात्रे व विकी म्हात्रे, सिद्धिविनायक हॉस्पिटल डॉक्टर कर्मचारी वर्ग,सुश्रुषा हॉस्पिटल पनवेल डॉक्टर व स्टाफ यांच्या सहकार्याने कॅम्प पार पडला. 50 वर्षे असलेल्या अशा 25 ते 30 नागरिकांनी लाभ घेतला. आरोग्य संबंधित 15 व्यक्तींना बुधवारी संध्याकाळी चार वाजता टू डी एको, टीएमटी सुश्रुषा हॉस्पिटल तर्फे मोफत करण्यात येईल. पेशंटला पिकप ड्रॉप हॉस्पिटलच्या अॅम्बुलन्स ने आणि मोफत करण्यात येईल अशी माहिती हॉस्पिटल जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे यांनी दिली.