शिवराज पाटील यांचे प्रतिपादन
। पनवेल । वार्ताहर ।
पोलीस खात्यामध्ये कार्यरत असाल किंवा इतर ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करीत असाल असे असले तरी प्रत्येक व्यक्तीसाठी नियमित व्यायाम व योग्य आहार हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन आज लाईफ स्टाईल या विषयाच्या विशेष तज्ज्ञ डॉ. सोनल पुरोहित यांनी श्रीकृपा बँक्वेट खांदा कॉलनी, सेक्टर-6,नवीन पनवेल येथे पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्फत आयोजित परिसंवाद कार्यक्रमात केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. सोनल पुरोहित यांनी सांगितले कि, जीवनात नियमित व्यायाम व योग्य आहार हे महत्वाचे आहे. कारण प्रामुख्याने पोलीस खात्यामध्ये कार्यरत असताना त्यांना वेळेचे बंधन नसते. 24 तास कर्तव्य बजावत असल्याने त्यांच्या व्यायाम व आहारावर परिणाम होतो. परिणामी अनेक व्याधींना त्यांना तरुणपणीच सामोरे जावे लागते. तसेच त्यांनी काही प्रात्यक्षिके सुद्धा सादर करून दाखविले. त्याचप्रमाणे उपस्थित कर्मचार्यांनी आरोग्य विषयक विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी समर्पक व योग्य उत्तरे दिली व मार्गदर्शन केले.यावेळी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-2,पनवेल शिवराज पाटील, भागवत सोनावणे,रवींद्र दौंडकर, श्री.कोकाटे, डॉ.सोनल पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
लाईफ स्टाईल या परिसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना त्यांच्या जीवनात येणार्या अडीअडचणींना तसेच आरोग्यविषयक माहिती त्यांना देऊन त्यांचे जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे.
– शिवराज पाटील (पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-2,पनवेल)