उरण महाविद्यालयात आरोग्य तपासणी

| उरण | वार्ताहर |

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

डॉ. बाबासो कालेल वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या नेतृत्वाखाली 30 महाविद्यालयीन कर्मचारी व 125 विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आरोग्याची तपासणी केली. लिपिड प्रोफाइल टेस्ट करून सर्वांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निरसन तसेच कार्यक्रमात एड्स जनजागृती पोस्टर्स प्रदर्शन करण्यात आले. महादेव पवार समुपदेशक ग्रामीण रुग्णालय यांनी एचआयव्हीचे मार्गदर्शन केले. तृप्ती परजणे, डॉ. स्वाती म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, हिरा वीर, संजीवनी म्हात्रे, संगीता शिंदे यांनी आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.ए.आर.चव्हाण, डॉ. दत्ता हिंगमिरे, तानाजी घ्यार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version