चौल बेलाई येथे महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन

| रेवदंडा | प्रतिनिधी |

चौल बेलाई येथील उत्कर्ष महिला मंडळाने नम्रता नंदकुमार नाईक यांचा सत्कार व डॉ. मेघा घाटे यांचे महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्कर्ष महिला मंडळ चौल बेलाई तर्फे आयोजित केले होते.

उत्कर्ष महिला मंडळाच्या सदस्या सौ. नम्रता नंदकुमार नाईक या जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे 29 वर्षे सेवा करुन परिसेविका या पदावरुन सेवानिवृत्त झाल्या. त्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार उत्कर्ष महिला मंडळातर्फे करण्यात आला. या वेळी नंदकुमार नाईक यांचादेखील सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रभाकर नाईक यांनी केले प्रदीप धसाडे यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत अध्यक्षा सौ. रोहिणी म्हात्रे यांनी केले.

या सत्कार सोहळयास डॉ. मेघा घाटे, लता भोजने, प्रभा तारी, मदन ठाकूर, हरिश्‍चंद्र म्हात्रे, रघुनाथ राऊत, जयवंत कंटक, हेमा पाटील, नेत्रा पाटील, कवळे, अश्‍विनी भगत उपस्थित होते.

महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच रोजच्या कामामधुन थोडा वेळ स्वत: साठी राखून ठेवा. जे करावंसं वाटते ते खुशाल करा, इतरांची काळजी घेताना स्वत: कडे सुध्दा लक्ष द्या. आपले घर, आपले कुटुंब या बरोबरच आपले आरोग्य सुध्दा महत्वाचे आहे.

डॉ. मेघा घाटे
स्त्रीरोग तज्ञ

महिला मंडळाच्या पदाधिकारी हर्षला म्हात्रे, संगिता ठाकूर, रोहीणी म्हात्रे, राजश्री पिटनाईक, निशा पिटनाईक, रेवती म्हात्रे, निर्मला म्हात्रे, नाईक, अपेक्षा भगत, पल्लवी नाईक, ऐश्‍वर्या भगत यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version