। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
संचालक मंडळ हायस्कूल नागाव व आधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागाव हायस्कूल येथे वयात आलेल्या मुली व त्यांच्या मातांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीराचा लाभ 88 विद्यार्थीनी व 20 मातांनी घेतला. या सर्व महिला तसेच विद्यार्थ्यानींची तपासणी अलिबागच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मेघा घाटे यांनी केली. या शिबिरात मुलींना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्त्व तसेच आपली नाती कशी जपावी याविषयी डॉ. मेघा घाटे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आधार संस्थेचे अध्यक्ष निलेश म्हात्रे, ए.जी.पाटील मुख्याध्यापक नागाव हायस्कूल, शिक्षिका जान्हवी बनकर, वर्षा पाटील, तनिष्का नाईक, मंजुषा पाटील, चोरघे, सुशील जाधव, कासार, मोहन पाटील, सिद्ध कॉटेजचे मालक व जयश्री हॉस्पीटलच्या डॉ. दिपाली पाटील व परिचारिका नम्रता भगत यांचे सहकार्य लाभले. तसेच नागाव हायस्कूलच्या कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.