लसीकरणासाठी आरोग्यविषयक निर्बंधानाच फाटा

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
पश्‍चिम बंगालमध्ये लसीकरणासाठी आरोग्यविषयक निर्बंधानाच फाटा देत नागरिकांची झुंबड उडाली. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली असन यामध्ये 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पश्‍चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यामध्ये शेकडो नागरिकांनी लसीकरण केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका वरिष्ठ अधिकार्‍यांने दिलेल्या माहितीनुसार, लसीसाठी झालेल्या या चेंगराचेंगरीत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. धूपगुडी आरोग्य केंद्राचा मुख्य दरवाजा उघडताच बाहेर जमलेल्या लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की करत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version