। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
दुर्गम आणी डोंगराळ भागात राहत असलेले ग्रामस्थ आजारी पडल्यास आजही शेकडो मिटर पायी चालत जावे लागते. मात्र, त्यांची शरिरिक प्रकृती उत्तम रहावी यासाठी एटीजी हेल्थ केअर सामाजिक संस्था पुढाकार घेत असून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे साकुचीवाडी या गावामध्ये जाऊन ही आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांना लागणारी औषधे मोफत देण्यात आली. या उपक्रमाला बिलियन हार्ट बिट्टींग यांचे सहकार्य लाभत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी आजही गंभीर परस्थिती असून अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय करताना घरातील गृहस्थांची तारांबळ उडत आहे. याचबरोबर दिवसेंदिव विविध आजार डोके वर काढत असताना घरचे भागविणे कठिण जात आहे. यासाठी एटीजी हेल्थ केअर सामाजिक संस्था पुढाकार घेत असून सातत्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. यावेळी या परिसरातील लहानांपासून ते वयोवृद्ध यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे डॉ. विश्वासराव गिरी आणि अश्विनी गिरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी परेश, राठोड, लक्ष्मण सिद, रोहित पाटील अदि उपस्थित होते.