| आपटा | प्रतिनिधी |
अल्काईल अमाइन्स केमिकल्स लिमिटेड पाताळगंगा यांच्या सौजन्याने सीएसआर निधीमार्फत चौक ग्रामीण रुग्णालयात विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात 200 बेडशीट, दाताच्या सर्जरीसाठी उपयोगी इन्स्ट्रुमेंट कॅबिनेट, अन्न गरम राहण्यासाठी वॉर्मर ट्रॉली, फ्रिज, 3 बकेट सुविधा, रुग्ण परीक्षण टेबल, 30 गाद्या आणि वॉटर प्युरिफायर व कूलर अशा उपयोगी वस्तू नुकत्याच सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी अल्काईल अमाइन्सचे सिनियर मॅनेजर एच.आर. मॅथ्यू डीकुन्हा, पाताळगंगा एच.आर. अर्चना माने, सिनियर ऑफिसर सी.एस.आर. निकिता म्हात्रे, सी.एस.आर. कन्सल्टंट रवी ओंकार, प्रोजेक्ट को ऑर्डिनेटर सिजो आदी उपस्थित होते. या अगोदर अल्काईल अमाइन्सने नूतनीकरण केलेल्या सुसज्ज शस्त्रक्रिया विभागामुळे आणि इतर आरोग्य सुविधांमुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळाल्याचे डॉ. कालेल यांनी सांगितले.
अल्काईल अमाइन्सतर्फे आरोग्य सुविधा
