अल्काईल अमाइन्सची सामाजिक बांधिलकी
| रसायनी | वार्ताहर |
मनुष्य जीवन अनमोल आहे, त्यासाठी जीवनात घडणार्या वैद्यकीय घटनांसाठी आम्ही बांधील आहोत, हीच सेवा जीवनात महत्त्वाची सेवा आहे, असे प्रतिपादन अल्काईल अमाइन्सचे सी.एच.आर.ओ. उदय घाग यांनी केले.
चौक ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागाचे संपूर्ण नूतनीकरण आणि सुसज्ज उपकरणे देण्याचा कार्यक्रम चौक ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. अल्काईल अमाइन्स कंपनी पाताळगंगा यांच्या सी.एस.आर. फंडातून हे करण्यात आले. ते पुढे म्हणाले, येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता कालेल यांच्या सततच्या प्रयत्नाने आणि येथे रुग्णांना मिळणार्या सेवेमुळे आमचे सहकार्य लाभले आहे. अल्काईल कंपनी आम्हास नेहमी सहकार्य करते, त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करणे गरजेचे आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता कालेल यांनी सांगितले.
चौक ग्रामीण रुग्णालय येथे मिळणार्या सेवेमुळे रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे, येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हे रुग्णांच्या सेवेत असल्याचे सिप्ला कंपनीच्या धुरी यांनी सांगून वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता कालेल यांनी काया कल्प हे अभियान यशस्वी केले आहे. कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, सी.एच.आर.ओ. उदय घाग, सिनियर मॅनेजर एच.आर.मॅथ्यू डी कुन्हा, वर्क्स मॅनेजर नागनाथ खटकाळे, युनिट एच.आर. अर्चना माने, सी.एस.आर. ऑफिसर निकिता म्हात्रे, अधिकारी भास्कर भिंगारे, सी.एस.आर. कन्सल्टंट रवींद्र ओंकार, गणेश कदम यांच्यासह ग्रामस्थ, रुग्ण, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, कार्यकर्ते उपस्थित होते.