| आगरदांडा | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील लोकांना योग्य वेळी योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात हा या मागील उद्देश ठेवून अदाणी फाऊंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड यांच्या माध्यमातून मुरुड तालुका ग्राम पंचायत सावली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सावली ग्रामपंचायत हद्दीतील मिठागर, टोकेखार, जमृतखार, उसडी, खामदे 172 ग्रामस्थांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रुग्णांना औषधोपचार मोफत देण्यात आले.
यावेळी अदाणी फाऊंडेशनच्या प्रकल्प अधिकारी जयश्री काळे, अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. करणक वाघमारे, डॉ. प्राची वार्सोलकर, डॉ. दीपा वाघमारे, माजी सरपंच मंदा ठाकूर, ग्रामपंचायत सावली ग्रामसेविका झिरडकर मॅडम, अवधूत पाटील, ग्राम सखी प्राजक्ता अडुळकर उपस्थित होते. यावेळी आलेल्या रुग्णांना डॉ. यांनी सांधेदुखी आणि गुडघे दुखी यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. अदाणी फाऊंडेशन जयश्री काळे यांनी सांगितले की, गावपातळीवर स्थानिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता दिघी पोर्ट सदैव कटिबध्द आहे.