नेरळ ग्रामपंचायतीकडून उपाययोजना करण्याचे आवाहन
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ स्थानकाच्या आजूबाजूच्या भागात पावसाळ्यात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. या पूरसदृश्य भागाची पाहणी मध्य रेल्वेचे अभियंता यांच्याकडून करण्यात आली. या स्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी नेरळ ग्रामपंचायतीकडून करण्यात आली असून, नेरळ स्थानक परिसराची पाहणी रेल्वे अधिकारी आणि नेरळ ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून करण्यात आली.
नेरळ ग्रामपंचायत हद्दी मधील जात असलेल्या मुंबई-पुणे मध्य रेल्वेची मुख्य रेल्वेमार्ग जातो. या मार्गात अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणी वाहून नेणारे नाले आहेत. त्याचवेळी नेरळ गावातील गटारांचे पाणी वाहून जाणार्या नाल्यांचा आकार हा रेल्वे भागात लहान करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी सलग दोन दिवस पाऊस झाला की नेरळ स्थानकाच्या आजूबाजूचा परिसर जलमय होत असतो. दरवर्षी नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी यांना पावसाळ्यात रात्र जागून काढावी लागत होती आणि त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीकडून नैसर्गिक नाल्यातील पाण्याचे मार्ग सुस्थितीत करणे यासाठी पाठपुरावा सुरू होता. या सर्व भागांमध्ये उपययोजना करण्याचा आराखडा मध्य रेल्वेकडून तयार करण्यात येत आहे. त्या दृष्टीने मध्य रेल्वेचे कल्याण विभागीय सहायक अभियंता व्ही.जी. अल्लारू तसेच बांधकाम विभागाचे सहायक अभियंता यादव यांनी केली. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर, ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, सर्व कामांची पाहणी करून आपण तसा अहवाल मध्य रेल्वेकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण विभागीय सहायक अभियंता अल्लारु यांनी दिली आहे.