| अलिबाग | वार्ताहर |
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पीएनपी संकुलात होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल, बी. एड कॉलेजच्या ऋतिषा पाटील, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, मुख्य कार्यालयाच्या लेखापाल मनिषा रेलकर इतर मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. 26 जानेवारी हा दिवस देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव म्हणून साजरा केला, या दिनानिमित्त पीएनपी शाळांमध्ये भाषण स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन केले होते आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रकला व निबंध यांचे प्रदर्शन भरवण्यात आले.