| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या मंगळवारी (दि. 24) सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, हे प्रकरण 313 प्रकरणावर असल्याने सुनावणी होण्याची शक्यताच असल्याचं म्हटलं जात आहे. त्या दिवशी आयकर विभागाशी संबंधित एका मोठ्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणावर पुढची तारीख पडली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शिवाय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वीच चंद्रचूड हे ऐतिहासिक निकाल देणार का? याचं सर्वांनाच कुतुहूल लागलं आहे.