31 सेल्सियस तापमान, पाऊस गायब, भात शेतील धोका
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
राज्यात 11 जूननंतर मान्सून दाखल झाला आणि शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली. मात्र ऑगस्ट महिन्यात अल निनोमुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 60 टक्क्यांनी कमी झाले. यामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुरूड तालुक्यात उन्हाचे चटके बसत असून, पाऊस बेपत्ता झाला असून भात शेती करपली आहे. तालुक्यात सध्या 31 सेल्सियस तापमान असून दुपारी बाहेर पडणे अवघड झाले आहे.
दडी मारलेला पाऊस 1 सप्टेंबरपासून पडेल असा व्यक्त केलेला अंदाज फोल ठरला आहे. त्या नंतर 3 सप्टेंबरपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल असा अंदाज देखील खरा ठरेल असे दिसत नाही. याउलट मंगळवारी मुरूड तालुक्यात तापमान 31 सेल्सियसच्यावर पोचल्याने नागरिक घामाघूम झाल्याचे दिसत होते. ऑक्टोबर सारखी हिट निर्माण झाली असून सुपारी, भाजीपाला, भात आदी पिकांवर उष्णतेचा मोठा परिणाम दिसू लागला आहे. पाण्या अभावी तालुक्यातील भात शेती सुकून मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाने अचानक दडी मारल्याने ऑगस्टपासूनच भात पीक कोमजले आहे. पावसाचे पुनरागमन लांबल्याने बळीराजा धास्तावला आहे. येथील भात शेती पावसावरच अवलंबून असल्याने खेतकरी आकाशाकडे डोळे लाऊन बसला आहे. मिठागर, जमृतखार, टोकेखार, सावली, उसडी आदि गावातील उखाडु भातशेती पाण्याअभावी धोका होऊ शकतो.