सोसायटीच्या मिटींगमध्ये जोरदार हाणामारी

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईतील दहिसर एका गृहनिर्माण सोसायटी येथील पश्चिम म्हात्रेवाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सोसायटी अध्यक्षांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होत. या बैठकीला अध्यक्षांसह सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी, सोयायटी सदस्य आदित्य देसाई यांचा सोसायटी अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यासोबत वाद झाला. या झटापटीत अध्यक्ष नित्यानंद परिहार यांनी चक्क दाताने सदस्य असलेल्या आदित्य यांचा अंगठा तोडल्याचा आरोप आदित्य यांनी केला आहे. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आदित्य देसाई यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांच्या हाताला ड्रेसिंग केली आहे. याप्रकरण एमएचबी पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

Exit mobile version