माओवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेडचे जवान सुधाकर शिंदे यांचा वीरमरण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात करियामेटाजवळ रोड ओपनिंग करण्यासाठी गेलेल्या इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानावर माओवाद्यांचा बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात आईटीबीपीचे जवान सहाय्यक सेनानी सुधाकर शिंदे आणि गुरमुख सिंह शहीद झाले आहे. सुधाकर शिंदे हे नांदेड येथील रहिवासी होते. हल्ल्यानंतर माओवाद्यांनी जवानांच्या एके 47 बंदुकीसह वाकीटॉकी लुटून नेली.






