| महाड | वार्ताहर |
मुंबई -गोवा महामार्गावर लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसानी गस्त घालताना अटक केली आहे.
महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना झायलो गाडीचा यंशय आल्याने सदर गाडीची सविस्तर चौकशी केली. यावेळी सदर गाडीत चोरून आणलेले स्टिल व लोखंडी अँगल आढळून आले. गाडीमध्ये शुभम अनंत घाडगे, प्रतीक हरीश घाडगे, अन्य एकजण अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रस्त्याला कडेला लावले जाणारे स्टीलचे अँगल, नटबोल्ट आढळून आले. 12 लाख रुपये किमतीची एक चॉकलेटी रंगाची महिंद्रा कंपनीची झायलो कार, इंग्रजी सी आकार लोखंडी अँगल, नट बोल्ट असा एकूण 15,03,300 इतक्या किमतीचा चोरून आणलेला मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.