हिंद मराठा महासंघाचे पदाधिकारी जाहीर

। पनवेल । वार्ताहर ।
हिंद मराठा महासंघातर्फे कोकण प्रदेशाध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी कोकण प्रदेश नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मुंबई प्रदेश सरचिटणीसपदी मंगेश सावंत तर उत्तर मुंबई जिल्हा उपनगर अध्यक्ष पदी अनिल फोफले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पनवेल महानगर पालिकाक्षेत्र अध्यक्षपदी यतिन देशमुख, रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी अतुल चव्हाण,राजेंद्र जनार्दन भगत,पनवेल शहराध्यक्ष अनिल दामोदर जाधव, जिल्हा सल्लागारपदी चिंतामणी भास्करराव धुरी (अनंत) यांच्या निवडीला राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी मान्यता दिली.

या वेळी गणेश बाबाजी परब कोकण प्रदेश सचिवपदी निवड जाहीर केली आहे. पनवेल येथील निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त व हिंद मराठा महासंघ कोकण प्रदेश अध्यक्ष विनोदराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली त्यात निवडीची घोषणा करण्यात आली. इंद्रजीत भोसले प्रथमेश भोसले रायगड जिल्हा सरचिटणीस प्रथमेश सावंत राजेश परब आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version