कार्याध्यक्षपदी संजय मोहिते, उपाध्यक्षपदी अनिल मोरे, सचिवपदी दरवेश पालकर
। सुकेळी । वार्ताहर ।
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणार्या रायगड प्रेस क्लबच्या 2025-26 व 2026-27 या पुढील दोन वर्षासाठी नवीन पदाधिकार्यांची निवड मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांच्या नेतृत्वाखाली व विभागीय सचिव मनोज खांबे यांचे अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदासाठी प्रशांत गोपाळे यांची निवड झाली. तर कार्याध्यक्षपदी संजय मोहिते, उपाध्यक्षपदी अनिल मोरे, व सचिवपदी दरवेश पालकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. यापुढील इतर पदाधिकार्यांची नियुक्ती पुढील आठवड्यात करण्यात येणार आहेत, असे कोकण विभागीय सचिव तथा निवड अध्यक्ष मनोज खांबे यांनी पनवेल येथील साई बँकवेट हॉल येथे जाहीर केले.
नवनियुक्त पदाधिकार्यांचे स्वागत राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर व मनोज खांबे यांनी केले. या जिल्हा निवड प्रसंगी कार्यक्रमाला राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कोकण विभाग सचिव मनोज खांबे, रायगड जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, माजी अध्यक्ष अभय आपटे, जिल्हा सचिव अनिल मोरे, पनवेल तालुका प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे यांसह माजी कोकण विभाग सचिव अनिल भोळे, माजी जिल्हा अध्यक्ष विजय मोकल, भारत रांजणकर, विजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. ही निवड होण्यापूर्वी पनवेल तालुका प्रेस क्लबने नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. यात तालुक्यातील ड्रायव्हर व पत्रकारांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. या शिबिराप्रसंगी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, रायगड जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक, नितीन पाटील, व सुहास हळदीपूरकर नेत्र टीम चे प्रमुख सुहास हळदीपूरकर, यासह पनवेल प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे, आदिसंह पनवेल येथील पत्रकार उपस्थित होते.