विद्यार्थी आंदोलनाच्या स्टंटमुळे ‘हिंदुस्थानी भाऊ’ला पोलीस कोठडी

। मुंबई । वृत्तसंस्था।
सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. त्या व्हिडिओजमधून त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केले होते. त्याने विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक निदर्शनांच्या प्रकरणामध्ये हिंदुस्तानी भाऊला चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक करुन न्यायलयासमोर हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version