। मुंबई । प्रतिनिधी ।
मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेवा लवकरच महाराष्ट्रात येणार आहे. नागपूरकरच्या भोसले घराण्याचे सर संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजीराजे भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश आले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि.29) यांनी दिली आहे.