| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर गावात अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान, चिरनेर गावातील शाळा, कॉलेज व शासकीय कार्यालयाच्या प्रांगणात झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
चिरनेर येथील पीपी खारपाटील एज्युकेशन सोसायटी च्या शाळा कॉलेज व इंग्रजी माध्यमिक स्कूलच्या प्रांगणात उद्योगपती पीपी खारपाटील व उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली, तर चिरनेर प्राथमिक शाळेत ही ध्वजारोहण करण्यात आले. चिरनेर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सरपंच संतोष चिरलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रभात फेरी काढण्यात आली होती. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी सारे चिरनेर गाव दुमदुमून गेले होते.