जागतिक महिला दिनानिमित्त गृहपरिचारिकांचा सन्मान

| रसायनी | प्रतिनिधी |

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रसायनी येथील महिला उद्योग मंडळाने समाजातील एका महत्त्वपूर्ण घटकाचा, अर्थात ‘गृहपरिचारिकांचा’ सन्मान करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. रुग्णसेवा आणि वयोवृद्धांची काळजी घेणाऱ्या या महिलांचा गौरव करण्यासाठी मंडळाने विशेष समारंभाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला उद्योग मंडळाच्या अध्यक्षा सरोजिनी साजवान होत्या. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून गृहपरिचारिकांच्या कार्याचा गौरव केला. ”समाजातील रुग्ण आणि वयोवृद्ध व्यक्तींची सेवा करण्यात गृहपरिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्या केवळ सेवा करत नाहीत, तर आधार देतात,” असे सांगत त्यांनी उपस्थित सर्व गृहपरिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात उपस्थित गृहपरिचारिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच, त्यांना भेटवस्तू आणि अल्पोपहार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. महिला उद्योग मंडळाच्या या संवेदनशील उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Exit mobile version