आंतरराष्ट्रीय प्रवाशांना होम क्वारंटाईन अनिवार्य

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ नोंदविण्यात येत असून, खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्‍या प्रवाशांना भारतात आल्यानंतर सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन अनिवार्य करण्याचा आदेश दिले आहेत. सात दिवसांनंतर आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, हे आदेश 11 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version