एसटी वाहक छाया म्हात्रे यांनी हजारो रुपये असलेली महिला प्रवाशी यांची पर्स केली परत
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आपल्या कर्तव्यात कोणताही कसूर न करता एसटी वाहक छाया भरत म्हात्रे यांनी प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे.त्यांना एसटी बस मध्ये महिला प्रवाशी हजारों रुपये आणि इतर साहित्य असलेली पर्स तबाबयांची मिळालेली पर्स तब्बल चार दिवसांनी आहे तशीच्या तशी महिला प्रवाशी यांना अलिबाग आगरप्रमुख यांच्या समक्ष परत ककरीत प्रामाणिक पणा दाखविला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अलिबाग आगारात छाया भरत म्हात्रे या वाहक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत.वाहक छाया म्हात्रे या ९जून २०२२रोजी नेहमीप्रमाणे अलिबाग पनवेल या मार्गावर असणाऱ्या बस मध्ये कार्यरत होत्या.म्हात्रे ह्या सकाळी सात वाजता असणारी अलिबाग पनवेल ही बस घेऊन जात असताना अलिबाग बस मध्ये प्रवाशी संख्या ही जास्त प्रमाणात होती.अलिबाग आगारातून पनवेल येथे जाणारी महिला प्रवाशी अनुजा रुपेश राणे (जलपाडा,अलिबाग)ह्या पनवेल येथे घाईगडबडीत उतरून निघून गेल्या.मात्र जाताना त्यांनी त्यांची पर्स ही एसटी बस मध्ये विसरून गेल्या.महिला वाहक छाया म्हात्रे यांना बोलवून सदर पर्स महिला प्रवाशी अनुजा म्हात्रे हिच्या ताब्यात देण्यात आली.