। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
रायगड बौद्ध समाज युवा संघांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वाधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित कण्यात आले. यावेही प्रा.प्रविण भारती यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात पत्रकार मंगेश वाघमारे यांची कन्या विदिशा मंगेश वाघमारे हिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबरोबर तिच्या पुढील शिक्षणासाठी तिला शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. यावेळी तिला मान्यवरांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर ओव्हाळ यांनी केले. प्रास्ताविक नरेश गायकवाड यांनी केले. तसेच प्रभाकर ओव्हाळ, महेंद्र जाधव यांनी देशभक्तीपर गीत सादर केले; तर जितेंद्र गायकवाड यांनी आभार मानले.