। अलिबाग । वार्ताहर ।
ग्रामपंचायत चेंढरेचे कर्मचारी गोविंद रामभाऊ म्हात्रे यांना सांस्कृतिक सभागृह मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलनामध्ये राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. या सत्काराबद्दल चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, सदस्य यतीन घरत, ग्रामसेवक निलेश गावंड तसेच ग्रामपंचायतील कर्मचारी वर्गाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
गोविंद म्हात्रे पुरस्काराने सन्मानित
