| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन उरण येथे नुकतेच पार पडले. यामध्ये जिल्हा सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय रायगड-अलिबागचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक यांना जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्ष तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याध्यक्षा शैर्ला पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भालचंद्र वर्तक हे गेली 40 वर्षापासून अलिबाग सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय रायगड-अलिबाग येथे कार्यरत असून त्यांना या अगोदर महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त झाला आहे.
यावेळी ॲड. गौतम पाटील, शैला पाटील, संजय बोंदार्डे, अजित पवार, रामदास गायकवाड, नागेश कुळकर्णी आदी उपस्थित होते. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.