कर्जतमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान

। कर्जत । वार्ताहर ।

अभिनव प्रबोधिनी ट्रस्टच्या शारदा मंदिर विद्यालय क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिक व निवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक महादेव जुन्नरकर यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रमाकांत मोदी यांनी सैन्यात असताना आलेले अनुभव सांगितले. प्रकाश महाडिक यांनी आपला एक पाय युद्धात गमावला असला तरी देशा बद्दलचा आदर किंचितही कमी झाला नाही. उलट युवकांनी सैन्यात दाखल व्हावे असे आवाहन केले. त्यांचे अनुभव ऐकताना त्यावेळचे प्रत्यक्ष चित्र उभे राहिले व उपस्थितांचे डोळे पाणावले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश वैद्य, निवृत्त सैनिक मनोहर कदम, रमाकांत मोदी, श्रीकांत ओक, रवींद्र खराडे व्यासपीठावर उपस्थित होते. अंजली किसवे व छाया नगरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर प्रफुल्ल देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version