। नागोठणे । वार्ताहर ।
आ.रवि पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने सचिन मोदी यांच्या पुढाकाराने शहरातील व विभागातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये उदंड सीताराम रावकर व भानुदास मेहता या दोन माजी सैनिकांचा तसेच किशोर वामन बोरकर, परेश गुणाजी भोय आणि शैलेश महादेव विचारे या आजी सैनिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करत सत्कार करण्यात आला.
यावेळी मारुती देवरे, आनंद लाड, संतोष लाड, अशोक अहिरे, तिरथ पोलसानी, सिराज पानसरे यांच्यासह गौतम जैन, नामदेव मढवी तसेच विभागातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.