पोलीस अधीक्षकांच्या हस्ते कोलाड पोलिसांचा सन्मान

फरार आरोपीच्या आवळल्या होत्या मुसक्या
। कोलाड । वार्ताहर ।
किरकोळ वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रोहा तालुक्यातील सुतारवाडी विभागातील आंबिवली आदिवासीवाडी येथे घडली होती. याप्रकरणी गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाला होता. परंतु कोलाड सपोनि सुभाष जाधव व त्यांच्या टीमने मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केल्याने त्यांच्या विशेष कामगिरीची दखल रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी घेतली असून पोलीस स्मृतीदिनी कोलाड पोलिसांना सन्मानित करण्यात आले आहे.
याबाबत अधिक अधिक माहिती अशी की, कोलाड येथील फरारी आरोपी चंदर सुदाम वाघमारे रा. आंबिवली आदिवासीवाडी हा गुन्हा केल्यापासून फरारी झाला होता. आसपासच्या गाव व जंगल भागात शोध घेता आरोपी जवळच्या जंगलात एका झाडावर लपून बसलेला दिसला असता सर्व अधिकारी व अंमलदार यांनी त्यास शिताफीने ताब्यात घेहून अटक केली. सदर कामगिरी सपोनि सुभाष जाधव, अनिल घायवत, एएसआय संतोष माने, प्रसाद पाटील, नित्यानंद पवार, राकेश राऊळ, कृष्णा म्हात्रे, एजाज सलाउद्दीन यांनी उत्तम कामगिरी बजावल्याने त्यांच्या विशेष कामगिरीची दखल रायगड पोलीस अधीक्षकअशोक दुधे यांनी घेतली असून पोलीस स्मृतीदिनी कोलाड पोलिसांना सन्मानित करण्यात आले आहे.

Exit mobile version