मेघना चव्हाण यांचा सत्कार

। पेण । प्रतिनिधी ।
पेण मराठा समाज महिला मंडळाकडून मेघना चव्हाण यांची शिवसेनेच्या पेण शहर संघटक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मोगर्‍याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शिवसेना संघटिका दिपश्री पोटफोडे उपस्थित होत्या. यावेळी मराठा महिला मंडळच्या दिपीका शिगवण यांनी सांगितले की, आमच्या मराठा समाजाच्या महिला कोणत्या पक्षाचे काम करतात यापेक्षा आमच्या महिला समाज्यासाठी काही ना काही राजकीय पक्षांच्या माध्यमातून योगदान देत आहेत, हे महत्वाचे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या समाज्याकडून त्यांचा यथोचित सत्कार करणे आम्ही आमचे कर्तत्व समजतो. म्हणून आम्ही सतत सुगंध देणारा मोगर्‍याचा रोप देऊन सत्कार केला आहे. यावेळी सचिन शिगवण यांची रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली म्हणून त्याचा देखील सत्कार करण्यात आला. डॉ. निता कदम, छाया बामणे, छाया काईनकर, मनाली पवार, निकीता पिलाने, अर्चना माने उपस्थित होत्या.

Exit mobile version