| कर्जत । वार्ताहर ।
रोटरी क्लब कर्जतच्यावतीने श्री गणेशोत्सवात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या इको फ्रेंडली गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी आदर्श शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना, रोटरी क्लबने 15 वर्षांपूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन हुसेन जमाली यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. आदित्य जंगम यांनी केले. याप्रसंगी डॉ. मनोहर साबणे, सूर्याजी ठाणगे, राहुल वैद्य, भानुदास पालकर, प्रदीप गोगटे, आशिष गोखले, सदानंद जोशी, योगेश परदेशी, आनंद जोशी, धुराजी शिंदे, विलास शिंदे, सौरभ हिवरेकर, आशा ठोंबरे, आदी उपस्थित होते.