पालघरमध्ये भीषण अपघात; बारा जणांचा मृत्यू

। पालघर । प्रतिनिधी ।

पालघर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनर मध्ये हा भीषण अपघात झाला. वऱ्हाडाच्या ट्रक मध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वीस ते पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, एकाच वेळी तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version