| आगरदांडा | प्रतिनिधी |
केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुरूडच्या हॉटेल मालकांनी नाराजी दर्शवली आहे. मुरूड शहरासह पंचक्रोशी भागातील कामगार, विद्यार्थी अन्य नागरिक रोज सकाळी व सायंकाळी येथील हॉटेलमधील खाद्य पदार्थ खाण्यासाठी जात असतात. परंतु, गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल बंद होण्याची शक्यता हॉटेल मालकांनी दर्शविल्याने ग्राहकांनी चिंता व्यक्त केली आहे. हॉटेल व्यावसायीक संजय सिंह यांनी सांगितले की, जर दोन दिवसांत व्यावसायिक सिलिंडर सुरळीतपणे सुरू नाही झाले तर हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याशिवाय गत्यंतर नाही. हीच परिस्थिती सर्व ठिकाणी असणार आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायासह नोकरदारांवर होणार आहे. तरी सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून व्यावसायिक सिलिंडर सुरू करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
हॉटेल व्यवसायावर बंदीची नामुष्की
