अलिबाग तालुक्यातील 36 गावात 10 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण
तालुक्यातील 109 गावे आहेत कोरोनामुक्त
अलिबाग | भारत रांजणकर |
रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेत अलिबाग तालुका हा कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे अलिबाग तालुक्यात आहे. अलिबाग तालुक्यात 62 ग्रामपंचायती असून 219 गावे आहेत यापैकी 36 गावामध्ये दहा पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्णाची संख्या आहे. तर 109 गावात एकही कोरोनाचा रुग्ण नाही आहे. तालुक्यातील या 36 गावांमध्ये ग्रामसेवकांनी तात्काळ कोव्हिडं प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढत असल्याने अलिबाग सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी करण्याचे आव्हान स्थानिक प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा अद्याप कमी होताना दिसत नाही. कोरोना प्रादुर्भाव असलेली अनेक गावे, वाड्या, आळी प्रांताधिकारी याच्या आदेशाने कोरोना बाधित क्षेत्र घोषित करून बंद करण्यात आली आहेत. गावागावात ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांची अँटीजन, आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र तरीही अलिबाग तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश येत नाही.
अलिबाग तालुक्यात आतापर्यत 17 हजार 95 अलिबाग करांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 15 हजार 343 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात 490 जणांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाला आहे. अलिबाग तालुक्यात सद्यस्थितीत जिल्ह्यातही सर्वाधिक 1 हजार 262 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. पहिल्या लाटेत ज्या गावात कोरोना प्रादुर्भाव नव्हता अशी गावे दुसर्या लाटेत कोरोनाने बाधित झाली आहेत.
दहा पेक्षा अधिक रुग्ण असलेली गावे
आक्षी 35, आंबेपुर 18, बेलोशी 19, सारळ 16, वरसोली 23, मल्याण 11, वावे 42, चौल 39, शहाबाज 29, चेंढरे 88, धोकवडे 11, कामार्ले 17, शहापूर 15, पोयनाड 18, उसर 10, तळवलीतर्फे खंडाळा 28, वैजाळी 14, खिडकी 13, थळ 32, रेवदंडा 29, किहीम 25, कुरुळ 18, मानतर्फे झिराड 19, वाडगाव 12, रेवस 24, नागाव 30, परहूर पाडा 16, पेझारी 42, चिंचवली 16, कार्ले 14, हाशिवरे 14, भोंनग 11, सारळ 16, आंदोशी 24, गोंधळ पाडा 20, अलिबाग शहर 122