मालवणी येथे इमारतीवर इमारत कोसळली; ११ जणांचा मृत्यू

मुंबईतील मुसळधार पावसामुळं मालाडमधील एका इमारतीचा भाग कोसळला आहे. बुधवारी रात्री उशिरा मालाड मालवणी भागात एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी आहेत. (mumbai malwani building collapse)

मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एक दुमजली घर अचानक नजीकच्या दुमजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत ७ जणं गंभीर जखमी आहेत. तसंच, अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य अजूनही सुरु आहे.

Exit mobile version