| महाड | प्रतिनिधी |
तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, या पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील गोठे बुद्रुक येथील एक घर कोसळण्याची घटना घडली आहे. यामध्ये घरातील व्यक्ती सुदैवाने बचावली असून, घराचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.
मंगळवारी (दि.18) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये घरातील चंद्रकांत मांजरेकर (57) सुदैवाने थोडक्यात बचावले. घटनास्थळी तलाठी कार्यालयमार्फत पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अंदाजे सहा ते सात लाखांचे नुकसान असल्याचे समजते.
घर कोसळले, सुदैवाने बचावले
