। मुंबई । प्रतिनिधी ।
चेंबूरच्या वाशीनाका परिसरात गॅस सिलेंडर गळतीमुळे घरात आग लागली. हि दुर्घटना बुधवारी (दि. 13) रात्री 11च्या सुमारास घडली. यात एक वुद्ध वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाशी नाका परिसरातील म्हाडा कॉलनीतील एका इमारतीत राहणारे नाफिर सय्यद (60) यांच्या घरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि आरसीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत घरात अडकलेल्या नाफिर सय्यद यांना बाहेर काढले. नाफिर सय्यद हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ शीव रुग्णालयात दाखल केले.