शॉर्टसर्किटमुळे घराला आग

लाखो रुपयांचे नुकसान

| आंबेत | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील आमशेत येथील दिनेश चिचालकर या इसमाच्या घराला आज सकाळी साडे आठच्या सुमारास आग लागली. यामध्ये दिनेश यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग गावकर्‍यांनी पाण्याने विझवून आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. गरीब कुटुंबातील दिनेश चिचालकर यांनी आता सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

Exit mobile version