महाड शहरामध्ये घराला आग;महिला जखमी

। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील मध्यवर्ती वस्तीमध्ये असलेल्या एका घराला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीमध्ये या घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर झोपलेली एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला बाहेर काढल्याने ती वाचू शकली.

मंगळवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास न्यू इंडिया इन्शुरन्स ऑफिसच्या शेजारी असलेल्या संजय महादेव गांधी यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागली. घरामधील एका खोलीतील सामानाने पेट घेतला . त्यावेळी दुसर्‍या खोलीमध्ये संजय गांधी यांची बहीण सुरेखा महादेव गांधी (वय 56) या झोपलेल्या होत्या, त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न सापडल्याने धूर व आगीच्या झळा लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.सध्या त्यांच्यावर नवी मुंबईतील ऐरवली या ठिकाणी बर्न हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.

आगीची माहिती मिळताच महाड अग्निशमन दलाने घटना स्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले.आग समोरच लागलेली असल्याने सुरेखा गांधी यांना जखमी अवस्थेत जीवाची पर्वा नकरता अग्निशमन दलाने बाहेर काढले. या अग्नितांडवामध्ये महाड अग्निशमन दलातर्फे गणेश पाटील, गोविंद साळुंखे शेखर भोसले, श्रीकांत साळुंके, अमर पवार, गौरव देशमुख, चालक गणेश विनहेरकर यांनी मोलाची कामगिरी बजावली. या घटनेमध्ये संजय महादेव गांधी यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Exit mobile version