| अकोला | प्रतिनिधी |
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे घराला लागलेल्या आगीत वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंडगावातील बाजारपूरा येथे राहणारे सचिन ठाकरे यांच्या घरातील बेडरूममध्ये त्यांचा 9 वर्षीय मुलगा झोपलेला असतांना अचानक बेडरूमला आग लागली. बेडरूममधून धूर निघत असल्याचे वडील सचिन ठाकरे यांच्या लक्षात येताच वडिलांनी मुलाला वाचविण्यासाठी धाव घेतली. या आगीत मुलासह वडील गंभीर रित्या भाजले गेले होते. जखमी दोघांनाही अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंडगावात आग विझावण्यासाठी अग्नीशमन दल दाखल झालं होत. तोपर्यंत गावकऱ्यांनी आग विझवली होती. या आगीत अंदाजे घरादील सोने चांदीचे 3 लाख 75 हजारांचे दागिने यासह कपडे व घरेलु साहित्य अंदाजे किंमत 3 लाख आणि रोख रक्कम 1 लाख 85 हजार रुपये जळून खाक झाले.