पनवेलमध्ये फॅशन शोला भरघोस प्रतिसाद

नामांकित मॉडेल्सची झलक
। पनवेल । वार्ताहर ।

या पाहताच बाला, कलिजा खलास झाला, अशी काहीशी अवस्था समस्त रसिकांची झाली. निमित्त होते फॅशन शोचे. येथील हॉटेल पार्कमध्ये झालेल्या शोमध्ये नामांकित मॉडेल्सची झलक पनवेल, नवी मुंबईकरास पाहण्यास मिळाली.

या फॅशन शोचे संचालक आयुष जैन ,संस्थापक नीरु जैन हे यावेळी उपस्थित होते. सहा सिक्वेन्सेसमध्ये झालेल्या या शोमध्ये साठहून अधिक डिझाईन्स लोकांसमोर आणल्या गेल्याची माहिती निरू जैन, आयुष् जैन यांनी दिली.इव्हेंटअंतर्गत पार पडलेल्या या फॅशन शोमध्ये नामवंत मॉडेल्स, डिझाइनर्स, कोरीओग्राफर्सनी भाग घेतला. आगामी फॅशनची झलक पाहण्याची इच्छा असलेल्या नवी मुंबईकरांनी या शोला प्रचंड गर्दी केली होती.

एनएसएएन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे संस्थापक नीरू जैन आणि संचालक आयुष जैन यांनी या संस्थेची स्थापन जुलै 2019 मध्ये केली आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विजय शुक्ला ,दिनेश जैन आणि नितेश मुळे, भावेश परमार आणि विकास चव्हाण उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे विजेते पहिल्या वर्षी डिझाइन विजेता 2021- श्रेया प्रजापती, द्वितीय वर्षाचे डिझाइन विजेते 2021- श्रेया रंजन, पदवी संग्रह विजेता 2021 – कांचन सिंग, पदवी संग्रह विजेता 2020- बिल्किस नियाझी, इंटिरियर डिझाइन विजेता गट 1. सुहानी जैन, 2. विष्णू पवार, 3. दिक्षा तळेकर या प्रकारे विजेत्यांनी आपलंं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे.

Exit mobile version