1,74,000 लॅन्ड डेटा अपडेट
1,12,000 र्-केवायसी पूर्ण
प्रशासनाची प्रशंसनीय कामगिरी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला रायगड जिल्ह्यात उदंज प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यात 1 लाख 74 हजार 216 शेतकर्यांचा समावेश या योजनेत समावेश झाला आहे. महसूल,कृषी आणि ग्रामविकास विभागाने संयुक्तपणे ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
जिल्ह्यातील लॅन्ड डेटा ऑनलाईन अपलोड करण्याचे तसेच ई-केवायसी कार्यवाही पूर्ण करण्याचे काम रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, तहसिलदार सचिन शेजाळ, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कृषी विभाग, जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, डेटा एन्ट्री ऑपरेटर या सर्वांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. ऐन गणेशोत्सवाच्या काळातही कोणतीही सुट्टी न घेता जिल्हा प्रशासनातील या अधिकारी-कर्मचार्यांनी हे काम अल्पावधीतच पूर्ण केले.
लाभार्थ्यांची संख्या
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 9 सप्टेंबरपर्यंत रायगड जिल्ह्यात लॅन्ड डेटा अपलोड झालेल्या नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या:- 1 लाख 74 हजार 216, एकूण आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या:- 1 लाख 36 हजार 155, प्रमाणीकरणानंतर स्वीकृत झालेल्या एकूण अभिलेख्यांची संख्या:- 1 लाख 49 हजार 476, प्रमाणीकरण झाल्यानंतर स्वीकृत झालेल्या शेतकर्यांची संख्या:- 1 लाख 5 हजार 373 अशी आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दि.09 सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत रायगड जिल्ह्यात ई-केवायसी कार्यवाहीत आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकर्यांची संख्या- 1 लाख 36 हजार 155, ई-केवायसी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या:- 1 लाख 12 हजार 976 (82.98%) यापैकी कॉमन सर्व्हिस सेंटर (उडउ) मार्फत 75 हजार 957 (55.79%) लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यात आले आहे. अद्याप 23 हजार 179 (17.02%) लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे बाकी आहे. तर 31 हजार 711 (23.29%) लाभार्थी अपात्र ठरले आहे.
शेतकर्यांना दरमहा 2 हजार रुपये
केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत लाभार्थी शेतकर्यांना प्रत्येकी चार महिन्यांच्या कालावधीत 2 हजार रुपये दिले जातात. त्यानुसार वर्षाला एकूण 6 हजार रुपये अनुदान स्वरूपात बँक खात्यावर जमा करण्यात येतात. या योजनेतील लाभार्थ्यांची निवड करताना शासनाने काही नियम-अटी ठरवून दिल्या आहेत. त्यानुषंगाने प्रत्येक लाभार्थी शेतकर्याची माहिती अपडेट करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले व यासाठी दि.7 सप्टेंबर 2022 ही अंतिम तारीख घोषित करण्यात आली होती.
या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रायगड जिल्हा प्रशासनाकडे सोपविण्यात आल्यानंतर त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, ग्रामविकास व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचार्यांनी रात्रंदिवस काम करून लाभार्थी शेतकर्यांचा डेटा एकत्रित करून तो ऑनलाईन अपलोड करण्याची कार्यवाही काही दिवसांतच यशस्वीरित्या पार पाडली.
जमिनीचे क्षेत्र, बँक खाते क्रमांक, डाटा क्रमांक, खात्याचा प्रकार, फेरफारचा प्रकार अशा प्रकारची माहिती जमा करून ती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम करण्यात आले.
– डॉ.किरण पाटील, सीईओ, रायगड जि.प.