| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन अलिबाग तालुक्यातील सुतारपाडा येथील शेकडो ग्रामस्थांनी शेतकरी कामगार पक्षात बुधवारी अलिबागमध्ये प्रवेश केला. शेकाप नेते आ. जयंत पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, रायगड जिल्हा युवासेना समन्वयक पिंट्या ठाकूर, आदींसह शेकापचे अनिल पाटील, प्रफुल्ल पाटील उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाचे सुरेश गजणे यांच्या नेतृत्वाखाली सुतारपाडा येथील रविंद्र किसन गजणे, अजिता रविंद्र गजणे, अशिष नरेश गजणे, मनोज वसंत गजणे, कपिल शरद ठाकूर, विशाल प्रकाश ठाकूर, संतोष गजणे, संदेश पाटील, नीलेश पाटील, ऋषभ गोंधळी, प्रतिक गोंधळी, नीलेश गोंधळी, प्रितम गावंड, प्रेमनाथ गोंधळी, गणेश गोंधळी, मेघनाथ पाटील, अनिकेत पाटील, विजय गजणे आदींसह सुतारपाड्यातील ग्रामस्थ, महिला व दर्यावर्दी कोळीवाडा मित्रमंडळ अशा शेकडो जणांनी शेकापमध्ये प्रवेश केला.